

पहिली पायरी हा क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) या संस्थेचा एक अभिनव उपक्रम आहे. क्वेस्ट ही बालशिक्षणात दर्जेदार काम करणारी संस्था आहे. बालवयात मुलं भाषा व गणित कसं शिकतात याबद्दलचं शिक्षकांचं प्रशिक्षण, संशोधन व शैक्षणिक साहित्य निर्मितीचं काम क्वेस्ट मागील १७ वर्षांपासून करत आहे.
ह्या प्रकल्पासाठी RG Manudhane Foundation for Excellence या संस्थेकडून अर्थसाहाय्य मिळाले आहे.
