FAQs
हे कोर्सेस कोणासाठी?
मुलांच्या भाषा व गणिती विकासात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी सध्या कोर्सेस सुरू होत आहेत. पालक या शब्दाचा अर्थ सामान्यपणे आई-वडील असा घेतला जातो, पण इथे मात्र मुलाच्या शिक्षणावर प्रभाव टाकू शकेल अशी कोणतीही प्रौढ व्यक्ती, अशा व्यापक अर्थाने पालक हा शब्द वापरला आहे. (६ ते ८ वयोगतील मुलांच्या पालकांसाठी कोर्सेस नंतर जाहीर केले जातील.)
या कोर्समध्ये काय काय असेल?
कोर्सचा कालावधी दोन महिन्यांचा आहे. दोन महिन्यात दर पंधरा दिवासांनी एक या प्रमाणे पाच प्रशिक्षण सत्र होतील. एक सत्र चार तासांचे असेल. यासोबतच पालकांना शैक्षणिक साहित्य संच मिळेल. या संचात पुढील वस्तू असतील – भाषा व गणिताच्या संसाधन पुस्तिका, सहभागी वाचनाची पाच पुस्तके, चित्रकार्ड पुस्तिका, वर्गीकरणाचा खेळ.
प्रशिक्षण सत्र कसे असेल?
प्रशिक्षण सत्रात QUEST मधील तज्ञ व्यक्ती मुलांसोबत करायच्या कृती कशा करायच्या याचे डेमो व्हिडिओ व प्रत्यक्ष कृती करून दाखवतील. या कृतींचा सराव करून घेतला जाईल. त्यातील बारकावे व त्यामागची सैद्धांतिक भूमिका समजावून सांगितली जाईल. प्रशिक्षणात दिलेल्या संसाधन पुस्तिकांच्या मदतीने पुढील पंधरा दिवसांमध्ये घरी मुलांबरोबर काम करून बघायचे आहे. हे करताना आलेल्या अडचणी व प्रश्न पुढील सत्रात सोडवले जातील आणि पुढच्या कृतीही शिकवल्या जातील.
हा कोर्स केल्यानंतर पालक मुलाला कितवीपर्यन्त शिकवू शकतील?
हे कोर्सेस नवीन शैक्षणिक धोरणाशी संलग्न असून वयानुरूप अपेक्षित अध्ययन निष्पत्तीचा विचार येथे केला आहे. यानुसार पालकांनी कोर्स १ केल्यानंतर त्यांना आपल्या मुलांची शालापूर्व तयारी करून घेता येईल.
एक कोर्स सलग २ महिने करावा लागेल की मध्ये ब्रेक घेऊन करता येईल?
कोर्समधील सर्व कृती या एकमेकांशी निगडीत आहेत, तसेच काही कृतींची काठिण्यपातळी टप्प्याटप्प्याने वाढत जाते, म्हणून पूर्ण कृती समजून घेण्यासाठी सलग दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे.
शिक्षकांना पण हा कोर्स करता येईल का?
या कोर्समध्ये एका मुलाबरोबर किंवा जास्तीत जास्त दोन मुलांबरोबर एकत्रित काम कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक व सराव केला जातो. त्यामुळे वर्ग नियंत्रणाविषयीचे मुद्दे किंवा विविध सामाजिक स्तरातून येणाऱ्या मुलांचे प्रश्न कसे हाताळता येतील याबाबत या कोर्समध्ये वेळेअभावी कोणतेही मार्गदर्शन होऊ शकत नाही. कोर्सची ही मर्यादा असली, तरीही केवळ शिक्षण पद्धती समजून घेण्यासाठी शिक्षकही हा कोर्स करू शकतात.